‘सागर’च्या लाटेत ‘सूरज’ही डुबणार..? ; सावंतवाडी पोलीस ठाण्याचे जबाबदार अधिकारी लाच प्रकरणात.

1075

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांचाही लाच प्रकरणात समावेश आहे. सावंतवाडी या एकाच पोलीस ठाण्याचे दोन मुख्य अधिकारी सदर लाच प्रकरणात अडकले जाणार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर या प्रकरणात आता सावंतवाडीचे पीएसआय असलेले सूरज पाटील यांचाही समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त समजले आहे. मात्र आज ते मंत्री महोदयांच्या दौऱ्यात कार्यरत असल्यामुळे अधिक तपास होऊ शकला नाही.

लाच लुचपत पथक त्यांचा शोध घेत आहे. लवकरच सूरज पाटील यांना देखील ताब्यात घेण्यात येणार आहे. एकाच प्रकरणात दोन बडे अधिकारी अडकणार ही सावंतवाडी पोलीस स्टेशनला हादरवून सोडणारी बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून अजून यात ‘बडे मासे’ असतील काय?, याबाबतही जनसामान्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.