मनसेतर्फे वैभववाडीत आरोग्य शिबीर…!

वैभववाडी : गणेश जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आजोजित सिद्धी संतोष नारकर उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष यांच्यातर्फे फ्री चेकअप मेडिकल कँप मांगवली सिद्धवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेडिकल कॅम्पला शेकडो संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली आणि लाभ घेतला.

हा कॅम्प जिल्हा रुग्णालय कणकवली मधील डॉ. धर्माधिकारी सर आणि डॉ. पवार मॅडम यांच्या निरीक्षणाखाली यशस्वी रित्या पार पडला. तसेच पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार श्री. परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग कार्यकारणी सदस्य श्री. कुणाल किणलेकर, तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निलेश मेस्त्री, तालुका अध्यक्ष कणकवली धनराज गोरे आणि गिरीश उपरकर उपस्थित होते.