मुंबई : सध्या रणबीर कपूर हा त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अॅनिमल’ साठी चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या टीझरची वाट पाहत आहेत. त्यातच रणबीर आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आहे तो म्हणजे रामायण. नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी या चित्रपटाबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत.
या चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या नावाची चर्चा होत आहेत. यात रणबीर कपुर हा श्री रामाच्या भुमिकेत तर साई सीता मातेची भुमिका साकारणार आहे अशी चर्चा सुरु आहे.
‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने मद्यपान आणि मांसाहार सोडल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आता रणबीरच्या या चित्रपटात सनी देओलची एन्ट्री होणार आहे. सनी देओल या चित्रपटात खुप महत्वाची भुमिका साकारणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र याबाबत काही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटात केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र यशने या भुमिकेसाठी नकार दिल्याचे कळते.





