देवगडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विटकर यांना मविआच्या पदाधिकाऱ्यांनी धरले धारेवर.! ; ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पद प्रकरण.

68

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील जवळपास दहा वर्षे 60 टक्के पदे हे रिक्त आहेत यातील महत्त्वाची पदे भरण्याच्या अधिकार कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक यांना आहे. सद्यस्थितीत कर्मचारी रिक्त पदे असली तरी देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे.मात्र रुग्णालयातील रिक्त पदे भरणे व ग्रामीण रुग्णालयातील सोयीसुविधा व बांधकाम व्यवस्था पाहणे याबाबत माझ्याकडे कोणतेही अधिकार नसल्याची माहिती देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय विटकर यांनी दिली. मात्र डॉ विटकर दिलेली उत्तरे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाहीत. डॉक्टर विटकर हे आम्हाला उडवा उडवीची उत्तर देत आहेत. असा आरोप करत महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडत आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना याबाबत जाब विचारू असे सांगितले.
देवगड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरली गेलीत की नाही याबाबतची माहिती घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, काँग्रेस माजी तालुकाप्रमुख उल्हास मणचेकर, तुषार भाबल,शरद शिंदे,वालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान डॉ विटकर यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत किती पदे रिक्त आहेत. याबाबतची सविस्तर माहिती दिली. डॉ व नर्सेस यांच्या ६० टक्के जागा रिक्त असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वैद्यकीय अधीक्षक एक पद वैद्यकीय अधिकारी दोन पदे लिपिक दोन पदे सात पैकी तीन नर्सेसची पदे भरली आहेत. शिपाई एक पद रिक्त, सफाई कर्मचारी एक पद रिक्त, वाहन चालक एक पद रिक्त, अशी पदे रिक्त आहेत मात्र ही सर्व पदे भरण्याचा अधिकार आरोग्य उपसंचालक कोल्हापूर व आरोग्य उपसंचालक मुंबई यांना असल्याचे डॉ विटकर यांनी यावेळी सांगितले . शासनाची भरती प्रक्रिया अद्याप झालेली नाही. शासनाने NRHM खाली काही पदे भरलेली असून ती सहा महिने व 11 महिन्याच्या करारावर भरलेली आहेत. त्यामुळेच देवगड ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याचे डॉ संजय विटकर यांनी स्पष्ट केले.
मात्र महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचे या उत्तराने समाधान झालेले नाही. रुग्णालयातील शौचालयाची अवस्था गंभीर असतानाही त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे तर रुग्णालयाच्या बाहेर नव्याने शौचालय बांधणीचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. याचे मोबाईल वर काढलेले फोटो शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय विटकर यांना दाखवित रुग्णालय प्रशासन हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची कशाप्रकारे हेळसांड करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र रुग्णालयाच्या आवारात बांधकाम करण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत. या उत्तराने महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय विटकर यांच्यावर उडवा उडवीचे आरोप करत याबाबतचा जाब जिल्हा शिल्लक चिकित्सक यांना विचारणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला.