सावंतवाडी : भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विशालपर्व’ या कार्यक्रमाचा आज कुडाळ येथे शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता माजी खासदार तथा युवा नेते निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, विशाल परबांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचा ‘कीर्तन सोहळा’ आज सायंकाळी कुडाळात रंगणार असून हजारो वारकरींचा मेळा जमणार आहे. जिल्ह्यातील कीर्तन प्रेमी भाविकांनी ह्या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





