“अखेर वहिनी दिसणार?” ; सलमानच्या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स.

44

मुंबई : सलमान खान हा भारतीय मनोरंजन विश्वातला चर्चेतील अभिनेता. सलमानने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमधून लक्षवेधी भूमिका साकारला.

कधी सलमानने बजरंगी भाईजान मधून रडवलं, कधी दबंग मधून हसवलं तर कधी किक सारख्या सिनेमातून अॅक्शन केली. लवकरच सलमान खान टायगर 3 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सलमानने सोशल मिडियावर खास फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पाहून सलमान खानच्या फॅन्सनी एकच कल्ला केलाय.

सलमान खानसोबत असणारी ती कोण?

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. सलमान खानसोबत एक मुलगीही उभी असलेली दिसत असून ती कॅमेराकडे पाठमोरी आहे. मी तुझ्या पाठीशी कायम असेल असं कॅप्शन सलमानने या फोटोला दिलंय.

सलमान खानच्या फॅन्सनी थेट त्याच्या लग्नाबद्दल अंदाज लावला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी सलमान खानच्या फोटोवर जोरदार कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ‘भाऊ आणि प्रेम.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘तू लग्न करतोय का?’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘वहिनीचा चेहरा लवकरच समोर येणार आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘भाईजान तू लग्न करण्याच्या मूडमध्ये आहेस का?’

याशिवाय अनेकांनी या फोटोच्या माध्यमातून सलमान खान टायगर 3 चं प्रमोशन करत असून बाजूला उभी असलेली कतरिना कैफ आहे, असाही अंदाज लावला आहे.

टायगर 3 साठी जोरदार तयारी –

एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की, तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो.

यशराज फिल्म्सने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहितीची दिली. ते आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्स ची एक एक वीट रचत आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 हा पुढचा मोठा चित्रपट आहे.