भारतीय फिरकीपटूंचा भेदक मारा.! ; कांगारूंचा संघ १९९ धावात गारद.

49

चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप 2023 मधील पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंच्या फलंदाजांचा फडशाच पाडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे पॅट कमिन्सच्या चांगलंच अंगलट आले.

भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावात गुंडाळला. भारताकडून रविंद्र जडेजाने 3 तर कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. अश्विनने 1 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 41 धावांचे योगदान दिले.

भारतासमोर 200 धावांचे आव्हान –

भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंच्या फलंदाजांची चांगलीच अडचण केली. रविंद्र जडेजाने 3, कुलदीप यादवने 2 तर अश्विनने 1 विकेट घेत कांगारूंचा निम्मा संंघ गारद केला. यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 199 धावांपर्यंतच मजल मारता आली.