प्रेरणादायी – रिक्षा चालकाच्या मुलाच्या हाती रुग्णांच्या आरोग्याचे स्टिअरिंग.! ; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर ‘सर्जील’ झाला डॉक्टर.!

51

रोहा : शशिकांत मोरे

रोहा खालचा मोहल्ला विभागातील रिक्षा चालक असमद कर्जिकर यांचा मुलगा कु. डॉ. सर्जील असमद कर्जिकर याने आपल्या प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर डाॅक्टर बनून आपले डाॅक्टरकीचे स्वप्नं साकार केले आहे.त्याने मिळविलेल्या या यशाचे अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
के.ई.एस.मेहेंदळे हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण ते ज्युनिअर कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या कु. सर्जील असमद कर्जिकर याने पुढील सिनियर कॉलेज ते डिग्रीपर्यंत शिक्षण कोएसो लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षी त्याची जनरल सेक्रेटरी पदावर देखील निवड देखील करण्यात आली होती. कोरोना काळात त्यांनी डॉ. फरिद चिमावकर यांच्या खांद्याला खांदा लावून लोक सेवा केली होती.
घरची परिस्थिती हलाखीची असताना कष्ट व प्रचंड मेहनत तसेच जिद्दीच्या जोरावर एका रिक्षावाल्याच्या मुलांने डॉक्टर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. हि बाब मुस्लिम समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे मुस्लीम समाजातून अभिमानपुर्वक बोलले जात आहे.
आपल्या सोबतीचे रिक्षा चालक अ. समद कर्जिकर यांच्या मुलांने डॉक्टर पदवी प्राप्त केल्या बद्दल पीर गाझी शेख सलाऊद्दीन दर्गा रिक्षा चालक मालक कमेटीच्या वतीने डॉ. सर्जील अ. समद कर्जिकर यांचे विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी समाज सेवक बिलाल मोरबेकर,उपशहर प्रमुख समीर दाखवे,शिवसेना अल्पसंख्याक विभाग प्रमुख मुजम्मील येरुणकर, इस्माईल रोहेकर,मुबीन रोहेकर, जमाल रोहेकर, लाला शेख, मुनवर शेटे, रफिक खोपटकर, इफ्तीखार खांबरे, शेख आदम नवरंगे आदी रिक्षा चालक व मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान डॉ. सर्जील अ.समद कर्जिकर याने मिळविलेल्या सुयशाबद्दल रोहा अष्टमी अलखैरिया कमिटी अध्यक्ष शफी पानसरे, हाफिज एजाज किरकिरे, मुजीब आलेकर, अ. ररज्जाक तुळवे व समाजातील सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.