हांगझोऊ : आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेतून 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टी20 क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. हा सामना भारतीय संघाने 9 विकेट्सने जिंकला. यासह भारताने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारताकडून तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी नाबाद तुफान फटकेबाजी केली. भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 96 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले.




