‘येथे’ सापडली मानवी हाडे, कवटी अन् गळफास लावलेला दोर.! ; आत्महत्या केल्याची शक्यता, मृतदेह पोयरे येथील मयेकर याचा.

153

देवगड : देवगड तालुक्यातील पोयरे सातवण येथील जंगलमय भागात मानवी कवटी व हाडे मिळाले असून त्याच्याच बाजूला गळफास लावलेला दोर सापडल्याने आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून मृतदेहाची ओळख मयताची पत्नी यांनी पटली आहे. तो मृतदेह पोयरे येथील १६ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या राजेंद्र दामाजी मयेकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती देवगड पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यातील पोयरे सातवण येथील जंगलमय भागांमध्ये मानवी कवटी व काही हाडे मिळून आली . तसेच कवटीच्या शेजारी काजूच्या दोरीला गळफास लावलेला स्थितीत आढळला. मयताच्या शरीराचे इतर अवशेष हे जंगली जनावरांनी खाल्ले असल्यामुळे मिळाले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल ,कपडे ,अंगठी, छत्री, आदि वस्तू मिळाल्यात. पोयरे येथील १६ ऑगस्ट २०२३ रोजी बेपत्ता झालेल्या राजेंद्र मयेकर वय ४१ यांची पत्नी रसिका मयेकर यांना व त्यांच्या इतर नातेवाईकांना दाखविल्यानंतर त्यांनी सदरच्या वस्तू ओळखून मयत हा तीचा पती राजेंद्र दामाजी मयेकर असल्याचे सांगितले.
पहिले गावठणवाडी येथील राजेंद्र दामाजी मयेकर वय ४१ हे १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने देवगड पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत होते गुरुवारी पोयरे सातवन जंगलमय भागात हरवलेली गाय शोधण्यासाठी गुराखी गेली होते तेव्हा त्या गुराखी यांना मानवी कवटी व हाडे दिसली. त्यांनी याबाबत तेथील पोलीस पाटील यांना सांगितल्यानंतर पोलीस पाटील यांनी देवगड पोलीस स्टेशनला कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,पोलीस उपनरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार आशिष कदम, संदीप नाटेकर, स्वप्निल ठोंबरे,प्रसाद आचरेकर यांनी भेट द्या पंचनामा केला. त्याची मिळालेली हाडे व अवशेष डीएनए प्रोफाइलिंग साठी पाठविण्यात येणार आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हे करीत आहेत. मयत राजेंद्र मयेकर हा नोकरी गेल्यामुळे आर्थिक अडचणीत असल्याने त्याची मानसिक स्थिती सध्या बरी नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.