देवगड : देवगड पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त जुने पोलीस स्टेशन देवगड येथे शनिवार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे.
या पूजेनिमित्त शनिवार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ :३० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा डबलबारी सामना बुवा श्री. श्रीकांत शिरसाठ (वैभववाडी) व बुवा श्री. संदीप नाईकधुरे (बापर्डे) यांच्यामध्येही रंगणार आहे. तरी रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात आले आहे.





