एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ; रखडलेला महागाई भत्ता अखेर मंजूर, लवकरच येणार शासन निर्णय.

117

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला महागाई भत्ता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. आज संध्याकाळपर्यंत यासंदर्भातील सरकारी अध्यादेश अर्थात जीआर निघण्याची शक्यता आहे.  ज्य शासनानं एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला ४२ टक्के महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्यामुळं यंदाच्या ऑक्टोबर महिन्याच्या पगारातच कर्मचाऱ्यांच्या खात्यात तो जमा होणार आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.