युवा व्यावसायिक मुजीब शेख यांना मातृशोक.!

26

सावंतवाडी :  येथील बाजारपेठेतील गाडी व्यावसायिक मुजीब शेख यांच्या मातोश्रींचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे सामाजिक जीवनात मानाचे स्थान होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.