कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले गेले. या कार्यक्रमांचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनीनी भूषविले. यावेळी पर्यवेक्षक सौ. जाधव आणि अच्युतराव वणवे तसेच गांधी विचारांचे दर्शन घडविणारे वैचारिक भाषण ज्येष्ठ अध्यापक संदीप कदम, श्री. खरात सर, सौ. वारघडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये सौ. केळुसकर मॅडम यांनी दिग्दर्शन केलेले गांधी विचारांचे चरित्र मुकनाट्य विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम अभिनयाने सादर करून एक आदर्श घडवून आणला. श्री. बर्डे, श्री. मोर्ये सर यांनीही मुकनाट्य उपक्रमात मोलाची मदत केली.

म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रांचा आदर्श प्रशालेतील विद्यार्थ्यांना निर्माण होऊन मूल्य संस्कारित पिढी तयार व्हावी, हाच उद्देश या उपक्रमातून होत असतो. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमांचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख जे. जे. शेळके सर यांनी नियोजनबध्द केले होते. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले व कार्यक्रमांची सांगता झाली.



