सावंतवाडी : ‘स्वछता ही सेवा’ अभियानांतर्गत गांधी जयंतीचे औचित्त्य साधून संपूर्ण देशात महास्वछता अभियान राबविण्यात आले. ,या स्वछता अभियानात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शेकडो सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, देवगड, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, बांदा, परुळे या ठिकाणी स्वछता अभियान राबून त्याठिकाणचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या निमित्ताने सावंतवाडी – बेळगाव रोड या भागात स्वछता करण्यात आली. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर साहेब , मुख्याधिकारी सागर साळुंखे , आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, नगरपालिकेचे कर्मचारी तसेच डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो श्रीसदस्य उपस्थित होते.








