हिंदळे ग्रामस्थांचे २ ऑक्टोबर रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित.

105

देवगड : तालुक्यातील हिंदळे ग्रामस्थांनी दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना हिंदळे गावात टॉवर, रेंज व नेट मिळत नसल्यामुळे दि.०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याची नोटीस दिली होती. परंतु काही दुरुस्त्या करून काही प्रमाणात सुविधा निर्माण बीएसएनएल केल्या आहेत. तसेच नेट केबल सेवेची बॅटरी येत्या चाळीस दिवसात बसवून सदर नेट सेवा दुरुस्त करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.शुक्रवारी २९ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.४.०० वा.ल उपमहाप्रबंधक बी.एस.एन.एल्. लिमि.सावंतवाडी यांनी हिंदळे गावात येऊन ग्रामस्थांशी चर्चा करून आवाहन केले आहे . त्यामुळे ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे हिंदळे ग्रामस्थांनी सागितले. या चर्चेस हिंदळे ग्रामस्थ उपस्थित होते.