BIG BREAKING – सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीटे कापणार.? ; जे. पी. नड्डा, अमित शाहांनी घेतला आढावा.

28

मुंबई : राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे.  या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर  मुंबईतही काही जागांवर बदल होणार शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.