शिंदेंसमोर अनेक अडचणी, आमच्या केसशी संबंध नाही, दादांच्या राष्ट्रवादीचा दावा.! ; शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार?

82

एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, आमच्या केसमध्ये तसं काही नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल  यांनी सांगितलं. राष्ट्रवादीची केस पूर्ण वेगळी असून त्याचा आणि शिंदेंच्या केसमध्ये  काडीमात्र संबंध नाही असंही ते म्हणाले. नागालँडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून तसं प्रतिज्ञापत्र त्यांनी 30 जून रोजीच दिलं होतं अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिंदे गटाच्या केससंदर्भात केलेल्या दाव्यानंतर मात्र शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याचं दिसून येतंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने 30 तारखेला एक निर्णय घेतला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नागालँडच्या आमदारांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आमच्यात निवडणुका झालेल्या नाहीत  –

खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. 53 पैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार सोबत आहेत. नागालँडमधील सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. जेवढे प्रांताध्यक्ष आहेत ते केवळ नॉमिनेटड अध्यक्ष आहेत. माझ्या सहीने त्यांची नेमणूक करण्यात आलं आहे. पक्षात निवडणुका पार पडलेल्या नाहीत. जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील अध्यक्ष एकत्र मिळून पक्षाचा अध्यक्षाची निवड करतात. आमच्यात निवडणुका झाल्या नाहीत.