देवगड तहसील कार्यालय, परिसर झाला चकाचक .! ; ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची झाली अंमलबजावणी .

60

देवगड : ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत आज सकाळी ९ ते १० या कालावधीत देवगड तहसीलदार कार्यालयात देवगड तहसीलदार कार्यालय व परिसर स्वच्छ करण्यात आला. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उपक्रम संपन्न झाला. यावेळी निवासी नायब तहसीलदार विवेक शेट व अन्य महसूल शाखा अव्वल कारकून, वरिष्ठ सहाय्यक, कर्मचारी सहभागी झाली होते. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण देवगड तहसीलदार कार्यालय इमारत, इमारती सभोवातालचा परिसर या भागातील वाढलेले गवत, कचरा, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या सर्व एकत्रित करण्यात आल्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम’ राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छता ही सेवा २०२३’ ची संकल्पना ‘कचरा मुक्त भारत’ ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे.