भारतातील ODI वर्ल्डकप संपल्यानंतर लगेचचं श्रीलंकेत सुरू होणार अजून एक वर्ल्डकप.!

55

मुंबई : ‘आयसीसी’कडून पुढल्या वर्षी (२०२४) श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. गतविजेता भारतीय संघ सलामीला बांगलादेश संघाचा सामना करील. १३ जानेवारीला या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल, तर ४ फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होणार आहे.

१९ वर्षांखालील क्रिकेट करंडकात पहिल्याच दिवशी तीन लढतींचा थरार रंगणार आहे. यजमान श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यासह न्यूझीलंड- नेपाळ व इंग्लंड-स्कॉटलंड या दोन लढतीही पार पडणार आहेत. भारताचा सलामीचा सामना १४ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध होणार असून, त्यानंतर १८ जानेवारीला अमेरिका आणि २० जानेवारीला आयर्लंड या देशांशी दोन हात करावे लागणार आहेत.

श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील  करंडकात १६ देशांमध्ये जेतेपदाची झुंज लागणार आहे. १६ देशांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.

गटवारी :-

अ गट – भारत, बांगलादेश, अमेरिका, आयर्लंड

ब गट – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, स्कॉटलंड

क गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया

ड गट – अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

भारताच्या लढती :-

14 जानेवारी – बांगलादेश

18 जानेवारी – अमेरिका

20 जानेवारी – आयर्लंड.