मालवण : मालवण किनारपट्टीवरील तळाशील येथील समुद्रात काल सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान एक पर्यटक बुडाला. तर त्याच्या सहकाऱ्यास वाचविण्यात स्थानिकांना यश आले. अमोल करपी(वय-३६) रा. बेळगाव असे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचे नाव आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील किनाऱ्यावर 8 वाजण्याच्या दरम्यान अमोल करपी याचा मृतदेह आढळून आला. अमोल करपी हा लाटांच्या प्रवाहात समुद्रात बुडून बेपत्ता झाला. स्थानिकांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू होता. 8 वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह आढळून आला.








