सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजू परब यांच्या मडूरा येथील निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी गणरायचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बांदा उपसरपंच जावेद खतीब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, मडूरा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश परब, आप्पा परब, तेजस परब यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.







