मळेवाड जकातनाका गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात | राजघराण्याने घेतलं दर्शन

सावंतवाडी : मळेवाड जकातनाका येथील श्री गणेश मंदिरात आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी श्रींची पाद्यपूजा, महाआरती व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी फार मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले व युवराज लखम राजे भोसले यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी कै. रमाकांत सदाशिव मराठे यांच्या स्मरणार्थ हेमंत मराठे व प्रसाद मराठे यांच्याकडून स्पीकर बॉक्स देण्यात आला.

सदरचे सदरचा स्पीकर बॉक्स खेमसावंत भोसले व युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे, माजी सरपंच विकास नाईक, माजी उपसरपंच नंदू नाईक, मंदिर व्यवस्थापक सदस्य गुरुप्रसाद नाईक, दिलीप शिरसाट, व्यापारी रमाकांत नाईक आदी उपस्थित होते. यानंतर चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्य नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला. मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची जयंती साजरी करण्यात आली.