सावंतवाडी: तालुक्यातील मळेवाड येथे दीड दिवसाच्या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. टाळ्यांचा गजर, तबल्याची साथ आणि सुमधुर आरतींचा जागर यामुळे विसर्जन स्थळी उत्साहवर्धक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!, ”बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला.!”, असा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी भावमय निरोप दिला.







