कुडाळ : येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाच्या आगमनाची मिरवणूक बजाज शोरूम ते भाजप कार्यालय पर्यंत काढण्यात आली. सिंधुदुर्ग राजाच यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली १४ वर्षे केली जात आहे. याही वर्षी डीजेच्या तालावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली असून मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थित विधिवत गणरायाची पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.






