पटवर्धन चौकात केला कमळ वाटपाचा शुभारंभ ; कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा पुढाकार.

39

कणकवली : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौकात आज सोमवारी मोफत कमळ फुल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवलीत पटवर्धन चौकासह शहरातील माजी नगरसेवकांमार्फत प्रभागांमध्ये देखील कमळ फुलाचे वाटप करण्यात आले. पक्षाचे चिन्ह यानिमित्ताने घराघरात पोहचावे व गणेशोत्सव कालावधीमध्ये नागरिकांना मोफत कमळ उपलब्ध व्हावे या उद्देशून नगराध्यक्ष यांनी मोफत कमळ फुलाचे वाटप केले.