मुंबई : मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल याच्याकडे नेतृत्व देण्यात आलेय. रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांना आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे या वनडे मालिकेत आर. अश्विन याला प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.
‘हा’ असेल भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.








