मुंबई विद्यापीठाच्या MSW विभागात ‘अर्ज मधले दिवस’ पुस्तकावर चर्चासत्र..!

सावंतवाडी : लेखक डॉ रुपेश पाटकर याच्यासोबत समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला समाजकार्याचे शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या घटकांसोबत काम करावे लागते. अर्ज हि संस्था देह विक्री व्यवसाय करत असलेल्या महिलांना समाजात आदर सन्मान मिळावा यासाठी गेली २४ वर्षे काम करत आहे. समाजामध्ये ज्याना नाकारलेपणाने पाहिले जाते अश्या देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत एक डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यानी या पुस्तकात मांडले आहेत. एक संस्था म्हणून अर्जचे काम तसेच एकूणच या महिलांच्या समस्या यावर यावेळी उहापोह झाला.
सर्व विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे वाचन केले होते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांविषयी कोणीही उघडपणे बोलत नाही. विद्यार्थ्यांना पाटकर सरांच्या या पुस्तकामुळे हा विषय समजून घेण्यात फारच सुलभ झाले.

या पुस्तकाच्या अनुषगाने विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न आले. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या व्यथा वेदनाची जाणीव झाल्याचे तसेच समस्या हाताळण्याचे तंत्र अवगत झाल्याचे आणि समुपदेशनाची प्रक्रिया समजल्याचे यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात मांडले. सरांनीही विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नाची खूप समर्पक उत्तरे दिलीत. या महिलांची माणूस म्हणून समाजात चांगली ओळख निर्माण व्हावी लोकांनी त्यांना माणूस म्हणून स्वीकारावे. तसेच शोषित म्हणून ज्या व्यवस्थेच्या त्या बळी पडतात आहेत ती व्यवस्थाच समूळ नष्ट व्हावी. यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.या उपक्रमात समाजकार्याच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सिंधुदुर्ग उपरिसराचे प्रभारी संचालक श्री श्रीपाद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अमर निर्मळे प्रा.माया राहटे आणि प्रा. पूनम गायकवाड यांनी केले.