कणकवली: गणेश जयंती उत्सव आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . कणकवलीच्या कलमठ गावातील नाडकर्णी नगर येथील गणेश मंदिरात गणेश जयंती दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते .
यानिमित्ताने गणेशाच्या पालखीची मिरवणूक येथील महापुरुष मंदिरापासून निघून पूर्ण नाडकर्णी नगर आणि स्वामी समर्थ नगर मध्ये फिरवली जाते . पालखीचे स्वागत दारादारात करून भाविक गणेश दर्शनाचा लाभ घेतात . दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दिवसभर धार्मिक कार्यक्रम साजरे केल्यानंतर सायंकाळी स्थानिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने गणेश जयंती उत्सवाची सांगता होते.





