बांदा : सरमळे देऊळवाडी येथील रमाकांत शिवराम परब (वय ५०) घरात विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुंबई – गोवा खासगी बसमध्ये ते क्लिनर म्हणून कामाला होते. ऐन गणेशोत्सवात या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सरमळे गावावर शोककळा पसरली आहे.





