सावंतवाडी : सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळातर्फे ३ सप्टेंबर २०२३ रोजी इ.५ वी व इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित संबोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. इयत्ता ५ वी मधून ६ विद्यार्थी व इयत्ता ८ वी मधून ३७ विद्यार्थी हे गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
इयत्ता ८ वी –
प्रथम – कु . सिद्धी हेमंत नाईक – ९८ गुण – विशेष प्राविण्य श्रेणी
द्वितीय – कृष्णा महेश पास्ते – ९६ गुण – विशेष प्राविण्य
अथर्व परशुराम सावंत -९६ गुण – विशेष प्राविण्य
तृतीय – तिर्था राकेश मोर्ये -९४ गुण -विशेष प्राविण्य
विराज नंदकिशोर राऊळ -९४ गुण – विशेष प्राविण्य
राजस केशव मुळीक -९४ गुण – विशेष प्राविण्य
इयत्ता ५ वी
प्रथम – सर्वेश नितीन गावडे -७४ गुण -प्रथम श्रेणी
चिदानंद रेडकर -७४ गुण -प्रथम श्रेणी
द्वितीय – जीत पुरुषोत्तम कानडे – ७२ गुण -प्रथम श्रेणी
तृतीय -प्रज्ञेश बलिराम सावंत -६८ गुण -प्रथम श्रेणी.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






