माघी गणेश जयंतीदिनी गणेश मंदिर इन्सुली – खामदेव नाका इथं कार्यक्रम…!

बांदा : गणेश मंदिर इन्सुली खामदेव नाका येथील माघी गणेश जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी

सकाळी ५.०० वा. महापूजा व आरती

सकाळी ६.०० वा. सत्यविनायक पुजा

दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद

सायंकाळी भजनाचा कार्यक्रम

सायं. ठीक ५ वा. श्री देवी माऊली मुळपुरूष ब्राम्हण माया प्रासादिक भजन मंडळ सायं. ठीक ६ वा. रवळनाथ माऊली समर्थ प्रासादिक भजन मंडळ तसेच रात्रौ ठीक ९ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा महान दणदणीत पौराणिक नाट्यप्रयोग शिव कवच हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.