कणकवलीत भाजप – सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा…!

कणकवली : कणकवली तालुक्यातील कनेडी येथे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आता तेथे तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे . भाजप आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा दुसऱ्याला भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बाजारपेठेत चोख बंदोबस्त ठेवला आहे. कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्या सह पोलीस निरीक्षक जाधव आणि सचिन हुंडळेकर हे स्वतः बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

कनेडी येथे भाजप विरुद्ध ठाकरे सेना असा दोन गटात सकाळी वाद झाला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कार्यालयात काम करत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येत भांडण केले असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. या भांडणाचे पर्यावरण धक्काबुक्की आणि नंतर शिवीगाळ करण्यात झाले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, सतीश सावंत आणि काही प्रमुख पदाधिकारी कनेडी येथे आल्यानंतर भाजपच्या महिला नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत यांच्यासह यांच्यासह शोकडो कार्यकर्त्यांनी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर शिवसैनिक भांडण करत असल्याबद्दलचा जाब आमदार नाईक आणि सतीश सावंत यांना विचारला.

यावेळी जोरदार वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यालयासमोर बंदोबस्त ठेवत या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आणखीनच गर्दी जमली असून आता तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.