बांदा : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने मळगाव सावंतवाडी रोड, घोडेमुख तिठा, मौजे पेंडुर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अं. 5,10,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दि. 14/09/2023 रोजी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य श्री. विजय सूर्यवंशी, संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई श्री. सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर श्री. विजय चिंचाळकर, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग श्री. वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मळगाव सावंतवाडी रोड, घोडेमुख तिठा, मौजे. पेंडुर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे मारूती सुझुकी स्वीफ्ट चारचाकी वाहन क्र. MH-07- AN 1703 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य रॉयल ब्रॅण्डच्या 50 पुट्ट्यांचे बॉक्स इतका अवैध मद्य साठा मिळून आला. सदर प्रकरणी आरोपीत फ्रान्सिस पिटर गोन्सालविस, रा. मठवाडी, तळवणे, घर नं. 178, ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्यामध्ये अं. रु.2,40,000/- किंमतीचे मद्य तसेच रु. 2,70,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं. रु.5,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग व श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. प्रसाद माळी जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. तानाजी पाटील हे करीत आहेत.






