सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज घुमणार राजधानी दिल्लीत.! ; १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान वादन.!

39

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, आंतरराष्ट्रीय मैदानाच्या उद्घाटनासाठी विशेष आमंत्रण.

कणकवली : एन. बी. एस. चॅरीटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला निमंत्रण आले आहे थेट दिल्लीहून. त्यांना हे आमंत्रण आले आहे त्याचे निमित्त देखील खास असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि द्वारका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मैदानाच्या उद्घाटनासाठी कणकवलीचा अभिमान असलेल्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला पाचारण करण्यात एएएलई आहे. तसेच रामनवमीला ते मध्यप्रदेश दौरा देखील यशस्वी करुन आले होते.  आता दिल्लीमध्ये त्यांना खास निमंत्रित केल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. दिल्लीसाठी सिंधुगर्जना पथक दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता मोपा विमानतळ गोवा येथून कार्याध्यक्ष सर्वेश हरीभाऊ भिसे, पथक प्रमुख नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रवाना होणार आहे.