GOOD NEWS – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अनिकेत गुरव देणार रुग्ण सेवा..!

19

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अनिकेत विनायक गुरव (राहणार सालईवाडा, सावंतवाडी मुळगाव आंबोली) नुकतेच दाखल झाले आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवा देणारे डॉ.अनिकेत गुरव यांनी एमबीबीएस ही पदवी परदेशामध्ये (चीन) घेऊन ते रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत.

डॉ.अनिकेत गुरव यांनी  मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्यानंतरचे शिक्षण पंचम खेमराज कॉलेजमध्ये घेतले.  २००७ साली शिक्षण घेऊन एमबीबीएस या शिक्षणासाठी चीनमध्ये एमबीबीएस ही पदवी 2015 साली पूर्ण केली.  शिक्षण घेऊन नुकतेच ते सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी दाखल झाले आहेत.

त्यांचे वडील विनायक गुरव हे समाजसेवक आहेत. नुकतेच डॉ. गुरव हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत दाखल झाल्याने त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी राजू मसूरकर यांनी केले.