सहवेदना – डाॅ. श्रीपाद उर्फ भाऊ जोशी यांचे निधन.!

40

बांदा : बांदा येथील डाॅ. श्रीपाद उर्फ भाऊ भालचंद्र जोशी वय 82 यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

मूळ तळकट येथील असलेले डॉ. श्रीपाद जोशी पुणे येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम रत्नागिरी पाली येथे बरीच वर्षे वैद्यकीय सेवा दिली. त्यानंतर त्यांनी बांदा येथे वैद्यकीय सेवा दिली. बांदयातील सेवाभावी डाॅक्टर अशी त्यांची ओळख होती. वैद्यकीय सेवेबरोबर त्यांनी बांदा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केले. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. बांदा पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालय उभारणीत त्यांचे योगदान आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार व कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी सुरुवातीपासून काम केले. महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम राबवून समाजाभिमुख कार्य केले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच त्यांनी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या बांदा शाखा संचालक म्हणून काम पाहिले. शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा त्यांनी ठसा उमटविला. स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सावंतवाडी शाखेचे लिपिक वीरेंद्र जोशी त्यांचे ते वडील होत.