विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात ; आजगाव मंडल अधिकारी कोदे यांची कारवाई.

474

सावंतवाडी : आजगाव मंडल अधिकारी कोदे यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून ताब्यात घेतला. ही कारवाई अप्पर तहसीलदार सावंतवाडी मोनिका कांबळे यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी विनायक कोदे व मंडळ अधिकारी बी. यू. गोरे, तलाठी सी नागराज, तलाठी उत्तम सावंत, तलाठी प्रवीण पोले यांनी कारवाई करुन सदरचा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथे जमा करण्यात आला आहे. पुढील दंडात्मक कारवाई सुरू आहे.