अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ले येथील एकावर कारवाई..!

68

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी वेंगुर्ले येथील जुस्तिन पीटर अराऊज याच्यावर कारवाई केली आहे. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पीएसआय रामचंद्र शेळके, अनुपकुमार खंडे, जयेश सरमळकर, आशिष गंगावणे, हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांनी ही कारवाई केली असून, वेंगुर्ला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.