मुंबई : समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चर्चा आणि बैठकीतूनच हा प्रश्न सोडवला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.





