BIG BREAKING – कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या.!

97

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे यांने कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तो येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. जितेंद्र शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. कारागृहात कैद्याची आत्महत्या होणे हे मोठी घटना असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

शिंदे हा कोपर्डी घटनेचा दोषी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला.