सावंतवाडी : आम्ही सगळे स्वत:ला हिंदू म्हणतो, मात्र ज्यावेळी आरक्षणाचा विषय येतो, त्यावेळी प्रत्येक जण हे आपापल्या जातीचा बनतो. आज महाराष्ट्रामध्ये सर्वच समाजातील जातीजातीमध्ये प्रचंड असंतोष असून महाराष्ट्र यामध्ये होरपळत आहे. प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण होत असून हे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला परवडणारी नाही. सर्वच राजकीय पक्षाने याचा सखोल विचार करून आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. समाजामध्ये पडत असलेली दुफळी नष्ट करून जाती-जातीमधील भिंत भिंती तोडून टाकाव्यात, सर्वच विचारवंताने बुद्धिजीवी टीकाकार यांनी महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, आरक्षणाचे महाराष्ट्राच्या मानगुटी वरती बसलेले भूत हे महाराष्ट्राला परवडणार नाही असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केलंय .





