Home ब्रेकिंग न्यूज इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सत्कार.!

इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सत्कार.!

47

सावंतवाडी : इनरव्हील क्लब सावंतवाडीतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांच्या निवासस्थानी जात सत्कार केला. शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सौ. मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडिज, माजी अध्यक्षा दर्शना रासम, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. मीना जोशी व सौ. नाईक उपस्थित होत्या. यावेळी सौ. रेडिज यांनी प्रा. मांजरेकर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत यापुढेही त्यानी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी, असे आवाहन केले.