सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, महामार्गावरील कशेडी बोगदा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कशेडी घाट पार करायला एक तास लागायचा, तेच अंतर आता अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे आणि याचं कारण म्हणजे कशेडी बोगदा !, लवकरच हा कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.





