बाप्पा पावला..!, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ.!

138

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३४ टक्के असलेला महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत होती. अखेर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाढीला परवानगी दिली आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या अभूतपूर्व संपानंतर शासनाकडून त्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळाली अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला आज हिरवा कंदील दाखवला.