कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि.२४/०८/२०२३ रोजी विद्यामंदिर येथे आयोजित जिल्हास्तरिय शालेय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत यश मिळविले आहे.
17 वर्षाखालील मुली- सबुरी नानचे(Foil)-प्रथम क्रमांक,सृष्टी मोरये-चतुर्थ,कृपा शिरकर(Epee)-द्वितीय, भूमिका चेचरे-चतुर्थ,प्रज्योती जाधव(Sabre)-द्वितीय,मुलगे-अथर्व तेली(Sabre)-तृतीय, ऋतुराज होसुरकर (Epee) चतुर्थ
19वर्षाखालील मुलगे-ऋग्वेद पिळनकर(Foil) तृतीय.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक सौ. व्ही.व्ही. जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गानी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कुमारी निधी केदारी हिची विभागीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत यश मिळविले आहे.
17 वर्षाखालील मुली- कुमारी निधी दिलीप केदारी-प्रथम क्रमांक,
14 वर्षाखालील मुली- कुमारी भक्ती राजेश कांदळकर -द्वितीय क्रमांक,
मुलगे- कुमार गौरेश उमेश सावंत, व कुमार प्रसन्न राजेश कांदळकर-द्वितीय क्रमांक .
निधी दिलीप केदारी हिची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक सौ. व्ही. व्ही. जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गानी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.





