सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए., एम. कॉम., बी. ए. बी. कॉम., बी. लिब., एम. लिब., पत्रकारिता, टेक्निकल या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षापासून मानसशास्त्र विषयात पदवी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन अभ्यास केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
एम. ए. शिक्षणक्रमात मराठी, हिंदी, अर्थशास्त्र व लोकप्रशासन हे विषय उपलब्ध करून दिले आहेत. अॅडव्हान्स अकाउंटिंग, बँकिंग अँड फायनान्स बिझनेस एंटरप्रिनिअरशिप व बिझनेस मॅनेजमेंट हे विषय उपलब्ध आहेत. तसेच एम. बी. ए. शिक्षणक्रमात एचआर, एमकेटी, एफआयएन हे विषय उपलब्ध आहेत. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांस प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थिनींसाठी नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी रुग्ण सहाय्यक हा शिक्षणक्रम उपलब्ध केले केलेला आहे. तसेच इलेक्ट्रिशन सारख्या टेक्निकल कोर्ससाठी विशेष मार्गदर्शन विद्यापीठ मार्फत दिले जाणार आहे. पत्रकार क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिप्लोमा इन जर्नालिझम त्याच बरोबर बी. लिब. व एम. लिब शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
बारावी उत्तीर्ण किंवा दहावी + किमान दोन वर्षे मुदतीचा पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी. ए. / बी. कॉम. शिक्षणक्रमास प्रवेश मिळेल. शिक्षणक्रम शुल्कातच अध्ययन साहित्य विद्यापीठाकडून पुरविले जाते. मुक्त विद्यापीठाची पदवी ही इतर सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठांशी समकक्ष आहे. तसेच स्पर्धा परीक्षा, पदोन्नती व इतर विद्यापीठात देखील शिक्षणक्रम घेण्यासाठी संधी मिळू शकते. विविध शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालयाशी – सावंतवाडी – डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आरपीडी कॉलेज गेट समोर ८६०५९९२३३४.
सावंतवाडी – श्रीराम वाचन मंदिर, मोती तलावाजवळ, ७३८५९७५२०२ / ९४२३३०१७३१.
कुडाळ- संत राऊळ महाराज कॉलेज ९४२०३०७२७१.
वेंगुर्ला- बॅ. खर्डेकर महाविद्यालय ९४२३८११९०५.
दोडामार्ग – नामदार भाईसाहेब प्रतिष्ठान, दोडामार्ग जुनि. कॉलेज परिसर ९८२३९७९४९३ येथे त्वरीत संपर्क साधावा.
प्रवेशाची अंतिम तारीख १० सप्टेंबर आहे.





