शिरोडा येथील विवाहिता बेपत्ता..!

165

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील रहिवासी रूक्षा राजन सारंग (वय ३८) ही महिला दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता आपण माहेरी गांगवली या गावी (ता – गोकर्ण, जि – कारवार, राज्य- कर्नाटक) येथे जाते असे तिचा नवरा राजन राघोबा सारंग यांना सांगून निघून गेली आहे.
मात्र सदर महिला अद्यापपर्यंत माहेरी गेलेली नाही. तसेच शिरोडा येथील घरीही परत आलेली नाही. याची चौकशी नवऱ्याने तिच्या माहेरी तसेच नातेवाईक यांच्याकडे केली. मात्र तिच्या बाबतीत माहिती कुठेही मिळाली नसल्याने राजन सारंग याने शिरोडा पोलीस स्थानकांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार शिरोडा पोलीस स्थानकात रक्षा सारंग बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सदर महिला कुठेही दिसून आल्यास शिरोडा पोलीस ठाणेचे पोलीस योगेश राऊळ मोबाईल क्र. -९४२१२३७६०१ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजेंद्र भिसे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश राऊळ, व अजित जाधव करीत आहेत.