कळसुलकर महाविद्यालयात ‘विद्यार्थी शिक्षक दिन’ उत्साहात साजरा..!

27

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात ‘विद्यार्थी शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी शिक्षक होवून इयत्ता अकरावी व बारावी कला, वाणिज्य विभागात विविध विषयाचे प्रत्यक्ष अध्यापन केले. शेवटी एकत्रित कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक यांनी आपले शिक्षक म्हणून प्रत्यक्ष काम करतानाचे विविध अनुभव व्यक्त केले.

विद्यार्थी मुख्याध्यापक विक्रम वडर, उपप्राचार्य तन्वी गावकर, पर्यवेक्षक अथर्व दळवी, विद्यार्थी शिक्षक म्हणून निलेश वैद्य,  अंनिस शेख, विशाल गावडे, शंकर भानसे, बायो आडवे, स्नेहा कोचरेकर, भाग्यश्री शेटकर, चिन्मय सोमस्कर, विद्यार्थी शिक्षक यांना गुलाब पुष्प देवून अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद कोलगांवकर यांनी केले. प्रास्तविक  प्रा. उत्तम पाटील यांनी केले. यावेळी अध्यक्ष मनोगत प्राचार्य नारायण मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  आभारप्रदर्शन सोनाली परब व आलेखा नाईक यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.