सावंतवाडी : सावंतवाडी शहरांमधील संचयनी परिसरातील, उभा बाजार, ईगल स्टोअर्स समोरील तसेच सावंतवाडी शहरातील ठीक-ठिकाणी जीर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे जनतेच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये या करिता सदर जिर्णपोल बदलण्या संदर्भात सामाजिक बांधिलकी संघटनेद्वारे एमएसईबी बोर्डाला दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते.
त्याची दखल घेऊन आजपासून सावंतवाडी शहरांमधील ठिकठिकाणी जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याकरिता सामाजिक बांधिलकी संघटनेने कडून एमएसईबी चे अधीक्षक भुरे यांचे आभार मानले आहे.





